मिशन नवोदय (EVS) 2300+प्रश्न

Description

 

प्रिय विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षक,

यावर्षीपासून जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा (JNVST) इयत्ता 6 वी च्या अभ्यासक्रमामध्ये EVS (पर्यावरण अभ्यास) या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. या विषयावर आधारित 20 प्रश्न (25 गुण) परीक्षेत विचारले जाणार असल्यामुळे या विषयाची सखोल आणि नियोजनबद्ध तयारी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

ही गरज लक्षात घेऊन मिशन स्कॉलर एज्युकेशन यांनी विद्यार्थ्यांसाठी EVS (पर्यावरण अभ्यास)TEST SERIES तयार केली आहे. ही टेस्ट सिरीज नवीन अभ्यासक्रम, NCERT Learning Outcomes (LOs) आणि नवोदय परीक्षेच्या स्वरूपाचा सखोल अभ्यास करून तयार करण्यात आली आहे. प्रत्येक प्रश्न विद्यार्थ्यांची संकल्पना, निरीक्षणशक्ती, तर्कशक्ती आणि अनुप्रयोग क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे.

या टेस्ट सिरीजमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे:

• 100+ घटकनिहाय व उपघटकनिहाय टेस्ट्स (• 2000+ दर्जेदार MCQs स्पष्टीकरणासह)
• प्रत्येक उपघटकावर आधारित 3 ते 4 सराव टेस्ट्स
• संपूर्ण EVS अभ्यासक्रमावर आधारित 25 Full Length Tests
• 500+ EVS च्या (पर्यावरण अभ्यास) संपूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षेच्या धर्तीवरील प्रश्न
• प्रत्येक प्रश्नासोबत सविस्तर उत्तर व स्पष्टीकरण
• नवोदय परीक्षेच्या दर्जानुसार तयार केलेले प्रश्नसंच

या टेस्ट सिरीजचा नियमित सराव केल्यास विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रमाची प्रभावी उजळणी होईल, संकल्पना अधिक स्पष्ट होतील, आत्मविश्वास वाढेल आणि प्रत्यक्ष परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळविण्यास निश्चितच मदत होईल.

ही टेस्ट सिरीज विद्यार्थी, पालक आणि मार्गदर्शक शिक्षक यांच्यासाठी एक विश्वासार्ह अभ्याससाधन ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.

तुमच्या यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

– टीम मिशन स्कॉलर एज्युकेशन

  

मिशन नवोदय (EVS) 2300+प्रश्न

₹149₹49971% off
Have a coupon?

₹149